मुंबई : २९ मार्चपासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. २४ मे रोजी मुंबईत अंतिम सामना खेळवण्यात येईल. आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान झालेल्या बैठकीत २ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
आयपीएलमध्ये यंदा पहिल्यांदाच कन्कशन सबस्टिट्युट आणि थर्ड अंपायर ‘नो बॉल’ च्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कोणत्याही खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर तो मैदानाबाहेर जाऊ शकतो आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते.
तर, आता स्पर्धेत प्रथमच नो बॉलच्या नियमामध्ये मैदानावरील पंचांच्या जागी हा निर्णय तिसरा पंच घेईल. त्याची चाचणी भारत आणि वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेत घेण्यात आली होती.आयपीएलच्या यंदाच्या हंगामात डे-नाईट सामन्याची वेळ ८ ऐवजी ७.३० करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, हा प्रस्ताव बैठकीत फेटाळण्यात आला आहे. यामुळे सर्व सामने ८ वाजता सुरुवात होतील.अशी माहिती देण्यात आली आहे.