पुणे, ३ ऑक्टोंबर २०२३ : आशियाई क्रीडा २०२३ च्या क्रिकेट स्पर्धेत भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने मोठ्या थाटामाटात उपांत्य फेरी गाठली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताने नेपाळचा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघ पहिल्यांदाच सहभागी होत आहे आणि पहिल्यांदाच सुवर्णपदकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
आज भारताने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा २३ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळाले. आज नेपाळी संघ निर्धारित २० षटकात १७९ / ९ धावाच करू शकला. आवेश खान आणि रवी बिश्नोई हे भारताकडून सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरले आहेत. दोघांनी ३-३ विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंगला २ आणि साई किशोरला १ असे यश मिळाले आहे.
आज भारताने नाणेफेक जिंकून नेपाळविरुद्ध २० षटकांत ४ गडी गमावून २०२ धावा केल्या. भारताकडून यशस्वी जैस्वालने १०० आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने २५ धावांची खेळी केली. यानंतर, शिवम दुबे (२५) आणि सिक्सर किंग रिंकू सिंग यांनी शानदार फलंदाजी करत ३७ धावा केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड