यवतमाळ वैद्यकीय विद्यालय रॅगिंग प्रकरण, पाच डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई !

यवतमाळ, २७ ऑगस्ट २०२२: यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक रॅगिंगची तक्रार विद्यार्थ्याच्या आईकडून नोंदवण्यात आली आहे‌. याच प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयातील पाच पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे‌.

डॉ. अमोल भामभानी यांच्या रॅगिंग प्रकरणी त्यांची आई जुही भामभानी यांनी अधिष्ठाताकडे तक्रार दिली होती. या वरुन अधिष्ठाता मिलिंद फुलपाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणा संदर्भात नाशिक आरोग्य विद्यापीठाची पाच सदस्यीय टीम सोमवारी यवतमाळमध्ये येणार आहे.

पहिल्या वर्षाला असलेल्या अमोल भामभानी याचा तृतीय वर्गात असलेल्यांकडून छळ झाल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार, डॉ. ओमकार कवितके, डॉ. अनूप शहा, डॉ. साइलक्ष्मी बानोत, डॉ. प्रियांका साळूंके, डॉ. पी.बी. अनुषा यांनी डॉ. अमोल भामभानी याला त्रास दिला होता.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे‌. पाच सदस्यीय टिम पुढील चौकशी करणार आहे. असे अधिष्ठाता मिलिंद फुलपाटील यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा