येडियुरप्पा यांची नात डॉ.सौंदर्याची आत्महत्या, होती डिप्रेशनची शिकार

बंगळुरू;29 जानेवारी 2022: भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या यांच्या संशयास्पद मृत्यूनं सर्वांनाच धक्का बसलाय. मात्र, हे प्रकरण आत्महत्या असल्याचं बोललं जात आहे. असं मानलं जातं की घटनेपूर्वी सौंदर्याने तिच्या मुलाला दुसर्या खोलीत सोडलं होतं. त्यानंतर तिच्या खोलीत येऊन स्वतः फाशी घेतली.

सौंदर्याचे पती डॉ. नीरज हे बंगळुरू येथे शुक्रवार, 28 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता त्यांच्या कार्यालयासाठी निघाले. घरात सौंदर्या आणि तिचं मूल एकटेच होते. काही वेळाने डॉ. नीरजला त्यांच्या मोलकरणीने बोलावून सांगितले की मॅडम (सौंदर्या) दरवाजा उघडत नाहीत. हे ऐकून डॉक्टर नीरज अस्वस्थ झाले आणि ते घरी परतले.

पळत असताना डॉक्टर नीरज त्यांच्या घरी आले आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. एका खोलीचे दृष्य पाहून त्यांच्या संवेदना उडाल्या. त्या खोलीत सौंदर्याचा मृतदेह फासावर लटकलेला होता. पत्नीची अशी अवस्था पाहून डॉक्टर नीरज अस्वस्थ झाले. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

पोलिस त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले आणि सौंदर्याचा मृतदेह खाली आणण्यात आला. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बंगळुरू येथील बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळी कसून तपास केला. मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. या प्रकरणी हाय ग्राऊंड पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूचा एफआयआर दाखल करण्यात येत आहे.

असं मानलं जातं की, सौंदर्याने तिच्या मुलाला एका खोलीत सोडलं आणि नंतर दुसऱ्या खोलीत गळफास लावून घेतला. ही दु:खद बातमी समजली तेव्हा सौंदर्याचे आई-वडील हुबळीत होते. बंगळुरूच्या बाहेरील डॉ. नीरज यांच्या फार्म हाऊसवर सौंदर्याचा अंत्यसंस्कार केला जाऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येडियुरप्पा यांची नात सौंदर्या ही देखील डॉक्टर होती आणि तिचं वय फक्त 30 वर्षे होतं. तिचा विवाह दोन वर्षांपूर्वी डॉक्टर नीरजशी झाला होता. सौंदर्या ही चार महिन्यांच्या बाळाची आई होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सौंदर्या येडियुरप्पा यांची मोठी मुलगी पद्मा यांची मुलगी होती. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की, सौंदर्या ही गरोदरपणानंतरच्या नैराश्याची शिकार होती. या प्रकरणात संशयास्पद काहीही नाही, प्रत्येकाला त्यांच्या नैराश्याबद्दल माहिती आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा