पुढच्या 2 दिवसांसाठी हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट जारी

मुंबई, 17 ऑक्टोंबर 2021: उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभावामुळं विदर्भ, सलंग्न मराठवाडा भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस होईऊ शकतो असं हवामान खात्याने सांगितलं आहे. राज्यात येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देखील जारी केला आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ यलो अ‌ॅलर्ट
उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
16 ऑक्टोबर- नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
17 ऑक्टोबर- नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस
प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा