भूस्खलन पाऊस आणि पुरामुळे लोक हैराण, मुंबईसाठी ‘यलो’ तर पालघर, ठाणे, रायगडमध्ये ‘ऑरेंज’ अलर्ट जारी

मुंबई, २३ जुलै २०२३: महाराष्ट्रात मान्सूनने आपत्तीचे रूप धारण केले आहे. अनेक राज्यांमध्ये पूर आला आणि जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने अनेक भागात कहर केला आहे. वादळी ढगांनी महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला असून, अनेक भागात एकाच दिवसात २४० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आज, रविवारीही अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईजवळील भिवंडीत मुसळधार पावसामुळे परिसर जलमय झाला असून त्यात अनेक वाहने आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. त्याचवेळी यवतमाळ जिल्ह्यातील आनंद नगर गावात अनेक लोक पुरात अडकले होते, त्यांना भारतीय हवाई दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

यवतमाळमध्ये शनिवारीच २४० मिमी पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले. हवामान खात्याने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर राजधानी मुंबईतही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगड इर्शाळवाडी गावात भूस्खलनाच्या घटनेला चार दिवस उलटूनही, अजुन ७८ जण बेपत्ता आहेत. शनिवारी अग्निशमन दलाच्या पथकांनी ढिगाऱ्यातून आणखी चार मृतदेह बाहेर काढले. अपघातातील मृतांची संख्या २६ वर गेली आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे पुरात अडकलेल्या ४५ जणांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा