येवला तालुक्यात खताचा काळा बाजार उघड

नाशिक, दि.२४ मे २०२०: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये असणाऱ्या एका गावात शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या खताबाबत काळाबाजार उघड झाला आहे. येवला पोलिसांनी धाड टाकून हे रॅकेट उध्वस्त केले आहे.

येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील सागर कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी ठेवलेला अनुदानीत युरिया खत शेतकऱ्यांना न देता युरियाची बॅग बदलून औद्योगिक वापरासाठी विक्री करत असतांना हा छापा टाकण्यात आला आहे.

नाशिक कृषि सहसंचालक विभागाच्या पथकाने छापा मारुन २ लाख १४ हजार ५०० रुपये मालाच्या ‘टेक्निकल ग्रेड युरिया फाॅर इंडस्ट्रि्अल युज ओन्ली’ या नावाने भरलेल्या १४३ गोण्या जप्त केल्या आहे. या पथकात विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक अभिजीत गुमरे, जिल्हा गुणवत्ता निरिक्षक किरण विरकर, येवल्याचे कृषि अधिकारी कारभारी नवले आदींनी ही कारवाई केली.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध येवला पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, खत नियंत्रण आदेश १९८५ व भादंबि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा