इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून योग भवन उभारणार – हर्षवर्धन पाटील  

इंदापूर, दि. ३० जुलै २०२०: शालेय विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक यांना योग साधनेचा उपयोग होऊन योगाच्या माध्यमातून चांगले आरोग्य उभे राहण्यासाठी इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेतून ग्रामीण पातळीवरील योग प्रशिक्षण देणारे उत्कृष्ट योग भवन उभारणार असल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी दिली.

पतंजली योग समितीने हर्षवर्धन पाटील यांच्याकडे योग भवन उभारण्याची करण्याची मागणी केली होती. पतंजली योग समितीच्या पदाधिकारी समवेत हर्षवर्धन पाटील यांनी सकाळी जागेची पाहणी केली. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून पाच कोटी रुपये अपेक्षित खर्च असलेले एक उत्कृष्ट ग्रामीण भागातील योग भवन उभारण्याचा संकल्प हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला. यामध्ये एकाच वेळी पाचशे व्यक्ती योगसाधना करतील असे त्याचे भव्य स्वरूप असेल.

यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, भागवत गटकुळ, पतंजलीचे योग समितीचे दत्तात्रय अनपट, मदन चव्हाण, रवींद्र परबत, विलास गाढवे, कनुभाई पटेल, नायर अण्णा, मायाताई विंचू, जयश्री शिंदे ,अर्चना शेवाळे यावेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा