मुंबई २१ जून २०२३: जागतिक योग दिनाच्या औचित्याने, आज भारतासह संपूर्ण जगामध्ये लोक योगा करत आहेत. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी जगामध्ये हा दिन साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या योगा दिनाला जगाने मान्यता दिली असुन या उपक्रमाला आता ९ वर्ष पूर्ण होतायत.
नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर, २१ जून हा जगभरात योगा दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन संयुक्त राष्ट्र संघाला त्यांनी केले होते, यावर जगाने मान्यता देत आज हा दिवस योगा दिन म्हणून साजरा केला. देशभर विविध शासकीय संस्थांसह अनेक ठिकाणी योगा दिन साजरा केला जातोय, मानवी आरोग्यसह माणसाच्या स्वास्थ्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे योगा दिनातून समोर आले आहे.
आज राज्यासह देशात विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात येेतोय. मुंबईतही योगादीन उत्साहात साजरा करण्यात आला. विधान भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावत नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, धकाधकीच्या जीवनामध्ये योग ही काळाची गरज आहे. याच्या आधी देखी भारत हा जगाला काहीना काही देत होता, आताही प्रधानमंत्री मोदी यांनी जगाला स्वस्थ आरोग्याची गुरुकिल्ली दिल्याचे गौरवद्गार त्यांनी काढले. राज्यातील नागरिकांना योग करा, स्वस्थ रहा, निरोगी रहा, असे आवाहन त्यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर