नवी दिल्ली, दि.१६मे २०२० : योगगुरू बाबा रामदेव यांनी “ऑर्डर मी” या नावाने वेबपोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोर्टलवर पतंजलीशी संबंधित सर्व उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे. तसेच अन्य स्वदेशी उत्पादने देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
ग्राहकाने उत्पादने ऑर्डर केल्यानंतर काही तासांमध्ये ग्राहकांपर्यंत ती पोहोचवली जाणार असून ते ही घरपोच सेवा देखील देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी माहिती पतंजलीच्या अधिकऱ्यांकडून देण्यात आली आहे.
याबाबत इकॉनॉमिक टाईम्सने वृत्त दिले आहे. या शिवाय या पोर्टलवरून मोफत वैद्यकीय सल्लादेखील देण्यात येणार असून पतंजलीशी निगडीत १ हजार ५०० जणांना याद्वारे संपर्क साधता येणार आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे वेबपोर्टल सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्यासाठी काम करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: