पुरंदर, देि.२ ऑक्टोबर २०२० : पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काल उत्तर प्रदेशातील योगी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भा.ज.प सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळाही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. रात्री उशिरा चौकामध्ये येत हा निषेध व्यक्त करण्यात आला.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप व पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सासवड येतील मुख्य चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा निषेध व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील राहुल गांधी यांना झालेली अटक व धक्का बुक्कीची घटना ही अत्यंत निंदनीय असून या घटनेचा पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचाही जाहीर निषेध व्यक्त करत असल्याचे सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे म्हणाले. पुरंदर तालुका पंचायत समिती सदस्य सुनीताकाकी कोलते यांनीही याबाबत निषेध व्यक्त केला. यावेळी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे युवक अध्यक्ष सागर मोकाशी, संजयअण्णा जगताप, अजित जगताप, मोहन जगताप, संदीप जगताप, सुनील धिवार, गंगाराम जाधव, भारत चौखंडे, विकास इंदलकर, अभिजित जगताप, किरण काळभोर, सागर जगताप, अक्षय उरसळ, ईश्वर दरेकर, कैलास धिवार, मोहन जगताप, रागिनी जाधव आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे