गोल पोस्ट राजकारण योग्य वाटा मिळाल्यास सत्ते मध्ये सहभागी होऊ- नितीश कुमार

योग्य वाटा मिळाल्यास सत्ते मध्ये सहभागी होऊ- नितीश कुमार

नवी दिल्ली: सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलास (जेडीयू) देखील आता केंद्रातील मंत्रिपदाचे वेध लागले असून योग्य प्रतिनिधित्व मिळाले तर आम्ही सत्ते मध्ये सहभागी होऊ असा निर्धार जेडीयू कडून व्यक्त करण्यात आला आहे.
या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पुढाकार घेतल्यास आम्ही त्याचे स्वागत करू असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. नितीश कुमार यांची काल सलग तिसऱ्यांदा जेडीयू च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version