जपानच्या नवीन प्रधानमंत्री पदी योशिहीदे सूगा यांची निवड

टोकियो(जपान), १४ सप्टेंबर २०२०: योशिहीदे सूगा यांना येत्या काही दिवसात जपानच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी मिळणार आहे. योशिहीदे सूगा हे सध्या जपानच्या सरकारमध्ये मुख्य कॅबिनेट सचिव पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. जपान मध्ये प्रधानमंत्री पदासाठी घोडदड ऑगस्ट महिन्यात सुरू झाली, जेव्हा शिंजो आबे यांनी स्वास्थ कारणास्तव पंतप्रधान पद सोडण्याची घोषणा केली होती.

सध्या जपान मध्ये लिबरल डेमोक्रेटिक पार्टी ही सत्ता मध्ये आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी पद सोडल्यानंतर एशियाच्या या शक्तिशाली राष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घोषणेनंतर याचे पडसाद हे संपूर्ण जगात दिसून आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शींजो आबे यांना फोन करून त्यांची प्रकृती बद्दल माहिती घेतली.

या घोषणेनंतर जपान मध्ये नवीन पंतप्रधान कोण ? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच या शर्यतीत सर्वात पुढे योशिहीदे सूगा यांचे नाव आहे. आज १४ सप्टेंबर, २०२० मध्ये जापानच्या सत्ताधारी पार्टीसाठी नवीन नेता निवडण्यासाठी मतदान झाले यात योशिहीदे सूगा हे विजयी झाले आहेत.

लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने एकदा आपला नेता निवडला की त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा जपानच्या संसदमध्ये मतदान होईल. त्यातही लिबरल डेमोक्रेटिक पार्टी यांना बहुमत असल्यामुळे योशिहीदे सूगा यांचा विजय निश्चित आहेत. यानंतर विजयी झालेल्या नेत्याला जपानच्या पंतप्रधान पदी विराजमान केले जाईल. आणि त्यांचा कार्यकाळ हा २०२१ पर्यंत असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा