पुणे, २ डिसेंबर २०२०: मोबाईल निर्मात्यांमध्ये लोकप्रिय असलेली कंपनी सॅमसंग आपल्या एस सीरीज व नोट सिरीज साठी जगभरात प्रसिद्ध आहे. पण आता या कंपनीचे काही स्मार्टफोन तुम्हाला पुढच्या वर्षीपासून म्हणजे जानेवारी २०२१ पासून घेता येणार नाही. याचे कारण असे आहे की सॅमसंग कंपनी आपली लोकप्रिय सिरीज गॅलेक्सी नोट बंद करत आहे. या अहवालानुसार कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे हाय-एंड स्मार्टफोनची मागणी कमी झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत कंपनीने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. असेही म्हटले जात आहे की दक्षिण कोरियन कंपनीची वर्ष २०२१ साठी गॅलेक्सी नोटची नवीन आवृत्ती विकसित करण्याची कोणतीही योजना नाही. या कारणास्तव लोकप्रिय असलेली ही नोट सिरीज बंद केली जाऊ शकते. या सीरिजमधील शेवटचा स्मार्टफोन म्हणजे नोट टेन होता. ज्यामध्ये नोट टेन, नोट टेन प्लस आणि नोट टेन लाईट असे तीन व्हर्जन बाजारात आले होते.
या सिरीजचे वैशिष्ट्य असणाऱ्या एस पेन किंवा स्टाईलस पुढील वर्षी सुरू होणार्या सॅमसंग गॅलेक्सी एस २१ मालिकेत दिसू शकते. सॅमसंग पुढील वर्षी बाजारात त्याच्या एस मालिके अंतर्गत नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एस २१ बाजारात आणण्याची तयारी करत आहे. हा एस स्पेन सॅमसंगने आतापर्यंत केवळ आपल्या नोट सिरीस मध्येच देऊ केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे