इंदापूर, दि. १९ जून २०२०: भिगवण येथील वर्कशॉपवर काम करत असताना विद्युत वाहिनीचा धक्का बसून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
संग्राम बिभिषण कन्हेरकर (वय २२ रा. खानोटा ता. दौंड) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. अफसर फॅब्रिकेशन या दुकानात संग्राम काम करत असताना अचानकपणे वीजेचा शॉक बसला त्यामध्ये तो बेशुद्ध होवून मयत झाला भिगवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत रामचंद्र निवृत्ती कन्हेरकर यांनी खबर दिली. संग्रामच्या अचानक जाण्याने भिगवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे