ब्रॅडफोर्ड, २० ऑक्टोबर २०२०: कोंबड्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एका युवकाला दोषी ठरविण्यात आलं आहे आणि तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती म्हणजे त्या युवकाची पत्नी होती जीनं कोंबडी सोबत संबंध बनवताना हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दोषी ठरलेल्या ३७ वर्षीय युवकाचं नाव रेहान बेग आहे. प्रकरण यूकेच्या ब्रॅडफोर्ड’चं आहे. ब्रॅडफोर्ड क्राउन कोर्टानं बेग यांना शिक्षा सुनावलीय.
अहवालानुसार या घटनेमुळं कोंबडी चा मृत्यू झाला आहे. परंतु या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याची पत्नी सुद्धा अशा विकृत कार्यांमध्ये त्याला प्रोत्साहित करत असे आणि हे तिनं मान्य देखील केलं आहे. तथापि, कोर्टानं या प्रकरणात त्याच्या पत्नीला अद्याप कोणतीही शिक्षा सुनावली नाही.
कोर्टानं बेगच्या कृतींना अत्यंत निकृष्ट आणि विकृत म्हटलं आहे. मुलांच्या लैंगिक शोषणाच्या छायाचित्रांची माहिती मिळाल्यावर बेगच्या घरावर राष्ट्रीय गुन्हे संस्थेनं छापा टाकला तेव्हा बेगच्या कृत्याचा खुलासा झाला.
बेगच्या संगणकात मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची छायाचित्रेही मिळाली. तपास करणार्यांनी कोर्टाला सांगितलं की, जप्त केलेल्या व्हिडिओमध्ये, बेगणे अनेक कोंबड्यां सोबत संबंध बनवल्याचं निदर्शनास आलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे