कोरोनाच्या लढाईत युवा राजकीय नेत्यांचे रंगले “ट्विटवॉर”

मुंबई, दि.१७ मे २०२० : राज्यात सध्या कोरोनाच्या लढाईशी आपण दोन हात करताना दिसत आहोत. हे संकट समोर असताना मात्र, राज्यातील दोन तरुण व्यक्तिमत्व ट्विटवरून एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.

ट्विटरवर सध्या आमदार रोहित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात चांगलेच शाब्दिक ‘वॉर’ रंगल्याचे आपण पाहतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर या वादाला सुरुवात झाली असल्याचे पहायला मिळते आहे.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे.

त्यानंतर निलेश राणे यांनी शुक्रवारी( दि.१५) रोजी त्या पत्रासंदर्भात एक ट्विट केले की, साखर उद्योगाला आजवर देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर त्यांनी साखरेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात आतापर्यंत किती पैसे खर्च झाले ह्याचे ऑडिट व्हायला हवे, अशी मागणी केली.

त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले की, पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असतात. पंतप्रधान मोदीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, अशा शब्दांत रोहित पवार यांनी निलेश राणे यांना उत्तर दिले होते.

पण हा वाद एवढ्यावरच थांबला नसून निलेश राणे रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर चांगलेच वातावरण भडकले आहे. निलेश राणे यांनी रोहित यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस, नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी, असा पलटवार केला. तसेच लगेच दुसरे ट्विट करताना निलेश यांनी रोहित यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे? असा सवाल करत मुंबईत राहून ठाकरे काही करु शकले नाहीत, असे देखील राणे यांनी म्हटले आहे.

या निलेश राणेंच्या टीकेला आमदार रोहित पवार काय उत्तर देतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. कारण शरद पवार आणि राजकीय चर्चा नेहमीच रंगत असतात. आता हा नवीन “ट्विट वॉर”ची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा