“आपला तो खोकला आणि दुस-याचा तो कोेरोना”! विचार बदलण्याची गरज…

पुणे, दि. २१ जुलै २०२०: कोरोना हा संसर्ग जन्य आजार असला, तरी भारतातील समाजात या आजाराकडे बघण्याची दृष्टी हि जरा ढिसाळ प्रवृतीची आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. भारतात या साथीच्या आजाराची लाट आली आणि अनेक स्तरातून माणसांची प्रवृती बाहेर पडली तर कहींची झोपलेल्या मेंदुच्या विचारांचे दर्शनही घडले.”आपला तो खोकला आणि दुस-याचा कोेरोना” हि सोशल मिडियावर भले मिश्किल पद्धतीने व्हायरल झाले. मात्र याचे वास्तववादी चित्र हे अनेक ठिकाणी दिसले.

जेव्हा एखाद्या कुंटूबातील व्यक्तीला कोरोना होतो तेव्हा त्या परिसरातील लोक हे त्याच्याकडे रुग्णाच्या भावनेने न बघता द्वेषाने बघतात. जसे की त्याने मुद्दामच या आजाराला आंमत्रण दिले असे आणि त्या कुटुंबा बरोबरचे समाजाचे वर्तन असे होते की त्या कुटुंबातील लोकांचे खच्चीकरण होते. हि परिस्थिती सर्व सामान्य जनतेची आहे आणि जेव्हा एखादा अभिनेता, अभिनेत्री, राजकीय नेता यांना याची लागण होते तेव्हा या समाजातील लोक त्यांच्यासाठी पुजापाठ, होमहवन, नवस, उपास तपास करताना दिसतात.

पुण्यातील दोन बहिणींच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता पण या नृत्यामागील सत्य काय ते आता समोर आले आहे. सलोनीनेच हे वास्तववादी मत ठामपणे मांडले आहे. सलोनी हि आपल्या कुंटूबासमावेत पुण्यातील धनकवडीत राहत होती. हसत्या खेळत्या कुुटुंबाला कोरोनाचे ग्रहण लागले आणि एका पाठोपाठ एक घरातील ५ सदस्यांचे कोरोना आवहाल हे पाॅजिटिव्ह आले. सलोनी ही घरी एकटी क्वांरनटाईन झाली मात्र या कठीण प्रसंगी तिला कोणीच आधार दिला नाही उलट तिच्या बरोबरची लोकांची वागणूक हि पुर्णपणे बदलली होती. अर्थात सलोनीला हे फार त्रासदायक वाटले.

जेव्हा घरचे काही सदस्य हे कोरोनावर मात करुन घरी आले तेव्हा तिचा हा भकास ऐकटेपणा दूर झाला आणि बहिण घरी येण्याची बातमी कळताच तिने तिचे स्वागत करायचे ठरवले. त्या दिवशी खरे तर तिला नृत्य करायचे नव्हते पण तिने आत दाटून बसलेल्या भावनेला या नृत्याचा माध्यमातून वाट मोकळी करुन दिली.

हि तर समाजातील एक सलोनी झाली पण संपूर्ण देशात अशा किती सलोनी आहेत याचा विचार एक माणूस म्हणून प्रत्येकाने केला पाहिजे.

हि समाजाची एक बाजू असली तरी पण या महामरीच्या संकटात फ्रंटलाईन वर उभे राहून कार्य करत आहेत ते आरोग्य कर्मचारी. त्यांच्या बरोबर संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा देखील… पण, नागरिक त्यांना ही पुर्णपणे प्रतिसाद देताना दिसत नाहीत. विशेष करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हा त्रास जास्तच सहन करावा लागत आहे. ही व्यक्ती रुग्णालयांमध्ये काम करते. तिच्यापासून आपल्याला देखील धोका आहे या कारणास्तव बऱ्याच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना समाजातून वेगळेपणाची वागणूक मिळत होती. एकीकडे कामाचा ताण तर दुसऱ्या बाजूला समाजाची विकृती…

या संकटाशी लढा देत असणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पोलिस कर्मचारी. या संकटावर मात करण्यासाठी अविरत दिवस-रात्र एक करून आपले कर्तव्य पोलीस कर्मचारी बजावत आहेत. तरीदेखील समाजातून त्यांना तुसडेपणाची वागणूक दिली जात. यासंदर्भात आणखीन एक उदाहरण म्हणजे श्रीधर पवार, जे कोल्हापूर मध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. श्रीधर हे कोल्हापूर पोलीस मध्ये गेल्या तीन महिन्यापासून फ्रन्टलाइन वॉरियर म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या या संकटाच्या काळात त्यांनी अविरत आपली सेवा समाजासाठी अर्पण केली. या दरम्यान त्यांच्या एका मित्राला कोरोनाची लागण झाली. त्याला लागण झाल्याचे समजताच खबरदारी म्हणून श्रीधर यांनी देखील आपली व आपल्या घरच्यांची कोरोना टेस्ट करून घेतली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. परंतु, समजाचा खरा चेहरा समोर आला, आजूबाजूला राहणाऱ्यांनी त्यांना तुसडेपणाची वागणूक देण्यास सुरुवात केली. ज्या समाजासाठी गेले तीन महिने ते अविरत आपले कर्तव्य बजावत होते आज त्याच समाजाने त्यांना वेगळे टाकले होते. ही खंत मनात ठेवून त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली जी येथे दिली आहे.

अखेर या कोरोनाने लोकांची पूर्ण मानसिकताच बदलून टाकली आहे. जिथे आपल्या सख्ख्या नातेवाईकाला देखील हात लावण्यास लोकं संकुचित वृत्तीने वागत आहेत तिथे या फ्रन्टलाइन वॉरियरचे काय ?, तरी ते आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. समाजातील अनेक व्यक्ती हे प्रशासनाबरोबर लढण्यासाठी पुढे येत गरजूंना मदती देखील करत आहेत.म्हणजे माणसातल्या देवाचे दर्शन देखील अनेक ठिकाणी झाले. तर अजूनही ते कार्य अविरत चालू आसल्याचे पाहयला मिळते.

सरकारने एक सुचना जारी केली “आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही” आणि याच तत्वावर चालून, माणसाने माणसातील माणुसकीची जणीव ठेवत. आलेल्या या कोरोना महामारीचा एकजुटीने सामना केला, तर नक्कीच विजय हा आपला आसेल.


न्यूज अनकट प्रतिनिधी

8 प्रतिक्रिया

  1. खरं आहे कोरोना ने दाखवून दिले कोण आपल आणि परक पण दूजाभाव न करता मदत करणे फार महत्त्वाचे आहे.
    छान लेख आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा