भोकरदन तालुक्यातील मलकापूर येथील युवकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या 

भोकरदन, ५ एप्रिल २०२४ : भोकरदन तालुक्यातील मलकापूर येथील युवकाने घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री ११ वाजेदरम्यान घडली आहे. योगेश गजानन वाघमारे (वय २४ रा.मलकापूर ता.भोकरदन) आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो ट्रक ड्रायव्हर होता.

बुधवारी नातेवाईकाचे लग्न असल्याने तो आणि सर्वच कुटुंबीय लग्नासाठी गेले होते. येथे लग्न लागल्यानंतर योगेश हाच एकटा घरी आला आणि त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. हा प्रकार ग्रामस्थांनी पाहिले असता त्यांनी त्वरित त्यास भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. पण तो मयत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

काल त्याच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून योगेश यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. त्याच्या या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त केली जात असून भोकरदन पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा