पुणे, १५ डिसेंबर २०२०: काल संपूर्ण जगभरात गुगलचं नेटवर्क डाऊन झालं होतं. ज्यामुळं सोशल मिडिया पुर्णपणे काही वेळेसाठी बंद होते. तर अनेक ठिकाणी अडथळा निर्माण होत होता. ज्यामुळं युट्युब आणि जीमेल देखील चालत नव्हतं.
गुगलच्या नेटवर्कमधे मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी काल सोशल मिडियावर झळकत होती. गुगल, गुगल ड्राईव्ह, जीमेल, युट्युब सेवा वापरताना ग्राहकांना आडचणींना सामोरं जावं लागत होतं. अनेक ठिकाणी युट्युब बंदच्या ही तक्रारी आल्या तर जीमेल देखील लाॅगइन होत नव्हतं.
गुगल’नं अखेर तांत्रिक बिघाड दुरूस्त करत लगेचच सेवा पुरवल्या. जीमेल, युट्युबच्या वापरासाठी युजर्सला लगेचच त्या सुरळीत करण्यात गुगलाला यश आलं.”आम्ही परत आलोय आणि आता युट्युब सुरू झालं आहे. “असं स्पष्ट करण्यात आलं. या सर्व दरम्यान जीमेल, गुगल ड्राईव्ह, युट्युब आणि इतर सेवा एक तास बंद होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव