उपोषणादरम्यान तब्येत बिघडल्याने YSRTP पक्षाच्या प्रमुख शर्मिला रेड्डी रुग्णालयात दाखल

हैदराबाद, ११ डिसेंबर २०२२ :आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आणि YSRTP पक्षाच्या प्रमुख शर्मिला रेड्डी यांना प्रजाप्रस्थानम पदयात्रेला परवानगी दिली नाही. याच्या निषेधार्थ टीआरएस सरकारच्या विरोधात शर्मिला यांनी शुक्रवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • शुक्रवार पासून उपोषण सुरु

शर्मिला यांनी शुक्रवारपासूनच अन्न आणि पाण्याचा त्याग केला. त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. शर्मिला यांचा रक्तदाब आणि शरीरातील ग्लुकोजची पातळी अत्यंत चिंताजनक असल्याचे अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.

टीआरएस सरकारच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांना पहाटे हैदराबादमधील स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.शर्मिला रेड्डींनी तेलंगणामध्ये केसीआर यांच्या पक्षाविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांच्या सरकारविरोधातील मोर्चाला मान्यता मिळालेली नाही. याच्या निषेधार्थ शर्मिला यांनी पक्ष कार्यालयातच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा