युवाशक्ती संघटनेच्या तालुका युवती कार्याध्यक्षपदी ऐश्वर्या लेंडे यांची निवड

पुरंदर दि.४ जून २०२०: कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या तालुका युवती कार्याध्यक्षपदी जेजुरी येथील ऐश्वर्या रमेश लेंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी संदर्भातील पत्र संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष प्रांजली जाधव यांनी लेंडे यांना दिले आहे .

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदिप ननावरे यांच्या आदेशावरून व कार्याध्यक्ष प्रविण आजबे, संघटक श्रीकांत राजपुत, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कंक, युवती प्रदेशाध्यक्ष रोशनी जैद आदिंच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. निवडीनंतर ऐश्वर्या लेंडे यांनी संघटनेच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील कृषी पदवीधर, विद्यार्थी,युवती आणि शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. या निवडीमुळे विविध क्षेत्रातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा