गोल पोस्ट आरोग्य झी गौरव पुरस्कार सोहळ्यावर कोरोनाचे सावट

झी गौरव पुरस्कार सोहळ्यावर कोरोनाचे सावट

मुंबई : जगभरात सध्या थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता भारत आणि पर्यायाने महाराष्ट्रावरही दिसून येत आहे.  याचाच परिणाम मनोरंजन उद्योगावरही होत आहे. यामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंगही रद्द करण्यात आले आहे. तसेच झी मराठी गौरव पुरस्कार सोहळाही रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
झी मराठी गौरव पुरस्कार सोहळ्याची नॉमिनेशन पार्टी नुकतीच पार पडली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन दिग्दर्शक संजय जाधव यांनी केलं होते. त्यानंतर झी मराठी गौरव पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष लागलं होते. मात्र आता हे पुरस्कार कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यातच सांगलीत होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनावर कोरोना इफेक्ट पाहायला मिळतोय. गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना मिळाल्यामुळे नियोजित नाट्यसंमेलनही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version