ॲक्शन, ड्रामा, उत्तम कथानकासह येत आहे ZEE5 ची ‘नक्षलबाडी’ वेब सिरीज

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२०: जर आपण या हिवाळ्यामध्ये सत्यस्थिती वर आधारित वेब सिरीज पाहण्याची इच्छा ठेवत असाल, जी या देशाच्या घडामोडी तील एक महत्वपूर्ण बाबीशी निगडित आहे, तसेच देशाच्या दुसऱ्या चेहऱ्याचे दर्शन देखील या वेबसिरीस मधून होईल तर तशी वेब सिरीज या महिन्यात आपल्या भेटीला येत आहे. अ‍ॅक्शन, ड्रामा, थ्रिलरने भरलेल्या झी 5 ची वेब सीरिज ‘नक्षलबाड़ी’ चा २८ नोव्हेंबरला प्रीमियर होणार आहे. ZEE5 ने यापूर्वीच या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांसाठी लाँच केला होता. हा ट्रेलर २ मिनिटांचा आहे आणि धुवाधार आहे. ४ नोव्हेंबरला रिलीज झालेला हा ट्रेलर आतापर्यंत ९४ लाख लोकांनी पाहिला आहे.

मालिकेच्या ट्रेलरमध्ये तुम्हाला प्राणघातक व प्रगत शस्त्रे, नक्षलवाद्यांचा आत्मविश्वास आणि हतबल पोलीस दिसतात. ट्रेलरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेले स्फोट दिसत आहेत. जळालेले मृतदेह, ‘लाल सलाम’ फलक त्यांच्यावर टांगलेले. नक्षलवाद्यांचा कट, पोलिसांचे कामकाज यातून या वेब सिरीज च्या कथानकाचा अंदाज येत जातो

पार्थो मित्रा दिग्दर्शित या सिरीज मध्ये पुलकित ऋषि आणि प्राखर विहान यांनी लिहिलेल्या उत्कृष्ट पटकथा, कला तसेच उत्तम संवाद सादर केले आहेत. अर्जुनसिंग बारन आणि कार्तिक निशंदर यांनी ही सिरीज तयार केली आहे. अ‍ॅक्शन डायरेक्टर अजिब गुलाबने एक्शन सीक्वेन्सला अप्रतिम केले आहे, तर परेश शहा यांचे बॅकग्राउंड म्युझिक तुम्हाला या थ्रिलर सिरीज मध्ये बांधून ठेवतात.

९ भागांची वेब सिरीज

‘नक्षलबाड़ी’ ZEE5 ची ९ भागांची वेब सीरिज आहे. ही अशी कहाणी आहे जी भारतातील नक्षलवादी चळवळीला टक्कर देते, ज्यात सर्व प्रकारचा उत्कृष्ट ड्रामा आहे तर थरार उडवणारी ॲक्शन देखील आहे. ह्या वेब सिरीज चे कथानक ऍक्शन आणि ड्रामा अशा पद्धतीने सादर केले गेले आहेत की यातील एक सुद्धा भाग तुम्ही सोडणार नाही.

दिग्दर्शक – पार्थो मित्र
निर्माता: अर्जुनसिंग बारन आणि कार्तिक निशंदर
अ‍ॅक्शन डायरेक्टर: ऐजाज गुलाब
डीओपी: हरी नायर, मोधुरा पालित
स्क्रीन प्ले आणि संवादः पुलकित ऋषि आणि प्रखर विहान

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा