पुणे, २१ मे २०२३ -: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत. जपानमधील हिरोशिमामध्ये सध्या ‘G-7’ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभागी होण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे क्वाड समुहातील नेत्यांची भेट घेतली. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमिर झेलेन्स्की यांची देखील भेट घेतली. यावेळी झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना युक्रेनला येण्याचे निमंत्रण दिले असून, भारताने केलेल्या मदती बद्दल आभार मानले आहेत.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जपानमध्ये भारताच्या पंतप्रधानांसोबत बैठक झाली. या भेटीवेळी त्यांना युक्रेनला येण्याचे निमंत्रण देखील दिले आहे. तसेच भारताने युक्रेनला केलेल्या मदतीचे आभार देखील झेलेन्स्की यांनी मानले आहेत.
युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये सुरू असलेले युद्ध अजून सुद्धा सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्रापती वोलोदीमिर झेलेन्स्की यांनी युद्धग्रस्त देशाच्या दौऱ्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर