‘झिंगर’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका

पुणे ७ मे २०२० :

स्व निर्मिती आणि एम के स्टुडिओ यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘झिंगर’ या मराठी लघुपटाचा डंका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या लघुपटाचे स्क्रीनिंग होत असून ती ज्यूरीज आणि समीक्षकांच्या चर्चेचा विषयही ठरली आहे.

नुकताच ग्रेटर नोएडा येथे होणार्‍या 10 व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘झिंगर’ला बेस्ट एडिटिंगचे दादासाहेब फाळके परितोषिक जाहीर झाले तेव्हा या लघुपटाचा आढावा घेण्यात आला.

आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मानाची बाब म्हणजे, रशियाच्या फेस्टप्रो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये शॉर्ट फिल्म विभागात जगभरातून पाच शॉर्टफिल्म्स निवडण्यात आल्या आहेत त्यात भारतातून एकमेव ‘झिंगर’ या मराठी लघुपटाची निवड झाली आहे. १३ ते १९ मे दरम्यान हा महोत्सव रशियामधल्या मॉस्को, सेंट पिटर्स्बर्ग, पेंझा आणि व्लादिमिर या शहरांमध्ये होणार आहे.

यापूर्वी या लघुपटाची निवड महाराष्ट्रातल्या काही चित्रपट महोत्सवांबरोबरच न्यूयॉर्क आणि कोलंबिया या ठिकाणीही झाली आहे. या लघुपटाचे विशेष स्क्रीनिंग धारवाड, चिपळूण आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे येथे झाले आहे.

हा लघुपट 35 मिनिटांचा असून, याचे लेखन आणि दिग्दर्शन वैभव कुलकर्णी यांनी केले आहे. बाजीराव सूर्यवंशी, विशाल कुलकर्णी आणि मच्छिंद्र धुमाळ हे निर्माते आहेत. प्रमुख शीर्षक भूमिकेत धारवाड, कर्नाटक इथली श्रुती कुलकर्णी ही बालकलाकार आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मनाभ गायकवाड याने या चित्रपटाला संगीत दिले असून, प्रतीक पाठक आणि अभि हजारे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. संवादाचे कोंकणी भाषांतर शैलेश भोजने यांनी केले आहे तर इंग्लिश सबटाईटल्स श्रेयश सूर्यवंशी यांनी केली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा