Zydus Cadila च्या ZyCoV-D लसीची किंमत ठरली, एका डोससाठी २६५ रुपये मोजावे लागणार

9

नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर २०२१ : Zydus Cadila च्या ZyCoV-D लसीची किंमत निश्चित करण्यात आली आहे. यासाठी प्रति डोस २६५ रुपये मोजावे लागतील. ही लस १२ ते १८ वर्षे वयोगटातील लोकांना दिली जाईल. सरकारने ZyCoV-D या तीन डोसच्या कोविड लसीचे एक कोटी डोस अहमदाबादस्थित कंपनी Zydus Cadila ला मागवले आहेत.

ZyCoV-D ही भारताच्या औषध नियामकाने १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी मंजूर केलेली पहिली लस आहे. ZyCoV-D ही लस सिरिंजच्या विरूद्ध सुई-मुक्त ऍप्लिकेटर वापरून दिली जाते. PharmaJet नावाचा एप्लीकेटर ९३ रुपये प्रति डोसमध्ये विकला जाईल. भारताच्या लसीकरण मोहिमेत ZyCoV-D लस अद्याप वापरली गेली नाही. २८ दिवसांच्या अंतरानं तीन डोस दिले जाणार आहे.

ZyCoV-D चे तीन डोस २८ दिवसांच्या अंतरानं दिले जातील. प्रत्येक डोस दोन्ही हातांवर दिला जाईल. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या विषय तज्ञ समितीने (SEC) १२ ऑक्टोबर रोजी २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी Covaxin ला काही अटींच्या अधीन राहून आपत्कालीन वापराचे अधिकार देण्याची शिफारस केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा