▪ मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी” कबड्डी स्पर्धेचे आयोजन 12 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2019 या कालावधीदरम्यान करण्यात आले आहे.
▪ हि स्पर्धा पुरुष, महिला, कुमार (मुले-मुली), किशोर (मुले-मुली) या सर्व स्थरांतील गटांसाठी होणार आहे असून ही स्पर्धा वडाळा-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिर पटांगणात होणार आहे.
▪ या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2019 असून त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच यासाठीचे प्रवेश अर्ज सर्व संलग्न संघांना दिले गेले आहेत.
▪ अधिक माहितीसाठी सायं. 07:00 ते 08:30 या वेळेत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे. या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई शहरचे प्रातिनिधिक संघ निवडले जातील.