मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जालन्याच्या गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल खुणे आणि दादासाहेब गुरड अशी दोघांची नावं आहेत. या दोघांना पोलिसांनी कायदेशीर अटक करून पुढील तपास सुरू केलाय.
आरोपी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा जुना सहकारी असून त्याने जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. त्यानंतर हा कट उघडकीस आल्याने पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी अमोल खुणे आणि त्याचा सहकारी दादासाहेब गुरड या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर काल रात्री उशिरा या दोघांना कायदेशीर अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आज या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता असून या प्रकरणातील अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: विजय साळी
