दिल्ली:राजधानी दिल्लीत 3 ते 4 आत्मघातकी दहशतवादी शिरले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळात दिल्ली पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच दिल्लीत ठिकठिकाणी वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
माहितीनुसार, दिल्लीत शिरलेले हे आत्मघातकी दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी आहेत.