आज दुपारी १२.३० वाजता जाहीर होणार बिहार बोर्डचा दहावीचा निकाल

बिहार, दि. २६ मे २०२०: (बीएसईबी) बिहार बोर्डच्या १० वी च्या निकालाचे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. अधिकृत माहितीनुसार, दहावीचा निकाल आज म्हणजेच मंगळवारी दुपारी १२.३० वाजता जाहीर करण्यात येईल. बीएसईबी समितीचे अध्यक्ष आनंद किशोर म्हणाले की, ही परीक्षा आदरणीय मंत्री, शिक्षण विभाग, श्री कृष्णनंदन प्रसाद वर्मा यांच्यामार्फत जाहीर केली जाईल.

गेल्या एका आठवड्यापासून बीएसईबी बिहार बोर्ड मॅट्रिकचा निकाल अपेक्षित होता, परंतू त्यावेळी मंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नव्हती. त्याचबरोबर हे सांगण्यात येत आहे की निकाल जाहीर करण्यासाठी मंडळ पत्रकार परिषद घेणार नाही. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या सामाजिक अंतराचा विचार करता, बिहारच्या निकालांची घोषणा मंडळाच्या कार्यालयात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर मीडिया कर्मचाऱ्यांना त्वरित त्याविषयी माहिती देण्यात येईल.

किती विद्यार्थी परिक्षेस उपस्थित झाले ?

यावर्षी दहावीच्या परीक्षेला १५.२९ लाखांहून अधिक विद्यार्थी उपस्थित झाले होते. मागील वर्षी १६.३५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. मागील वर्षी ८०.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. अशा परिस्थितीत मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल चांगला लागेल अशी अपेक्षा आहे. राज्य मंडळाने १२ वीचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर केला होेता तर यावर्षी कोरोना विषाणूमुळे दहावीचा निकाल लांबणीवर पडला आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० बिहारची दहावीची परीक्षा १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पार पडली.

गेल्या वर्षी दहावीचा निकाल कसा लागला ?

गेल्या वर्षी बिहार बोर्डाच्या दहावीच्या निकालात ८०.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. ज्यामध्ये सिमुलतला आवासीय स्कूलच्या विद्यार्थिनी सावनराज भारतीने प्रथम क्रमांक मिळविला. सावनराज भारती यांना ९७.२ टक्के गुण मिळाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा