केरळ, ८ सप्टेंबर २०२३ : केरळ येथील पुथुपल्ली मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस नेते चंडी ओमन यांनी मोठा विजय मिळवला आहे.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट विरुद्ध डावी आघाडी ही निवडणूक झाली. डाव्या आघाडीचे उमेदवार जॅक थाॅमस यांचा त्यांनी पराभव केला. तर एनडीएचे उमेदवार लिजिन लाल तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
चंडी ओमन यांना ८०,१४४ मते मिळाली तर थाॅमस यांना ४२ हजार ४२५ मते मिळाली तर लिजिन यांना ६,५५४ इतकी मते मिळाली आहेत. चंडी ओमन यांचे वडील माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी ही निवडणूक झाली. माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी या मतदारसंघातून १२ वेळा विजय मिळवला होता.
विजयानंतर चंडी ओमन म्हणाले, “या मतदारसंघाने गेली ५४ वर्ष आमच्यावर विश्वास ठेवला आहे. वडिलांवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी मलाही तितकेच प्रेम दिले आहे. या मतदारसंघाने विकासासाठी दिलेले हे मत आहे.” असे त्यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर