पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणे जवळ दरड कोसळली

पोलादपूर, ८ सप्टेंबर २०२३ : पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावर कुंभळवणे गावाजवळ दरड कोसळली. आज सकाळी ही घटना घडली. यामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. तर पायटा गावाजवळ एक झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुक धिम्या गतीने सुरू होती.

आजपासून पुन्हा सर्वदूर पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणे गावाजवळ दरड, मातीचा ओसरा खाली आला होता. त्यामुळे काही तास वाहतूक खोळंबली होती. पोलादपूर आपत्ती नियंत्रण कक्ष आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या पथकाने माती बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

पोलादपूर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुन्हा हवेत गारवा निर्माण झाला आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. मागील २४ तासांत पोलादपूर तालुक्यात ४१ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा