१५ ऑगस्टनंतर शाळा-महाविद्यालय सुरू होतील : रमेश पोखरीयाल निशंक

11

नवी दिल्ली, दि. ७ जून २०२०: लॉकडाऊन काळामध्ये शाळा, कॉलेज आणि इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वाटचाल याबाबत पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात बोलताना मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२० नंतर शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू केली जातील. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी सांगितले . ते पुढे असेही म्हणाले की १५ ऑगस्ट पर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करून व त्यानंतर शैक्षणिक संस्था व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ.

या संदर्भात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक यांना शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे एक निवेदन पत्र पाठविले होते . त्यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून त्यांनी ही माहिती सामायिक केली.

त्यांनी आपल्या पत्रात लिहिले की, “कोरोना सहित सहजीवन स्विकारण्याची आणि देशातील शाळांची भूमिका नव्याने निश्चित करण्याची वेळ आली आहे.”

यासह त्यांनी हे ही लिहिले की, जर शाळा ठळक भूमिकेसाठी तयार नसतील तर ती आपली ऐतिहासिक चूक असेल, शाळांची भूमिका केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित राहणार नाही तर मुलांना जबाबदार आयुष्य जगण्यासाठी तयार करणे देखील आहे.

सध्या लॉक डाऊनमुळे देशातील सर्वच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. कोविड -१९ चे संकट तात्पुरत्या स्वरूपातील नसून ते दीर्घकाळ चालू राहणारे आहे अशा परिस्थितीत शिक्षण संस्था व शाळा सुरू करण्याबाबत सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे.

सध्या महाराष्ट्रात काही खाजगी शाळांमधून १० वीच्या मुलांसाठी ऑनलाइन आभ्यास सुरू करण्यात आला असून काही शाळांनी पालक शिक्षक (PTA) व्हॉटस् अैप ग्रुपवरून मुलांना प्रत्येक विषयाचे असाईन्मेंट देवून ते पुर्ण करण्यास सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा