देशात २६४४ तर राज्यात ७९० नवीन कोरोना प्रकरणे

मुंबई, दि. ३ मे २०२०: कोरोना चा आकडा हा रोजच वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. दि. ३ मे म्हणजेच आज सकाळ १० पर्यंतची माहिती अशी, पूर्ण भारतात आत्ता पर्यंत ३९,९८० प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात २६४४ नवीन प्रकरणे वाढली आहेत. भारतात आत्तापर्यंत १३०१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात गेल्या २४ तासात ८३ नवीन मृत्यू समोर आले आहेत.

महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ता पर्यंत १२,२९६ प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात ७९० नवीन प्रकरणे वाढली आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ५२१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात गेल्या २४ तासात ३६ नवीन मृत्यू समोर आले आहेत. मृत्यू दर बघितला तर भारताचा ३.२५% आहे तर महाराष्ट्राचा ४.२४% इतका आहे. कालच्या प्रकरणांपेक्षा आज महाराष्ट्रात नवीन रुग्ण सापडण्याचा आकडा कमी आहे. काल हाच आकडा १००८ एवढं होता.

रुग्णवाढीचा वेग मंदावला :

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक चांगली बातमी देताना आत्तापर्यंत १०.५ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत होती. परंतु, हा वेग मंदावत आता १२ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचं म्हटले आहे.

कोणत्या राज्यात किती प्रकरणे:

मेघालय १२
मध्य प्रदेश २८४६
गुजरात ५०५४
महाराष्ट्र १२२९०
कर्नाटक ६०१
पश्चिम बंगाल ९२२
तेलंगणा १०६३
झारखंड ११५
पंजाब ७७२
हिमाचल प्रदेश ४०
राजस्थान २७७०
आसाम ४३
आंध्र प्रदेश १५२५
उत्तर प्रदेश २४८७
दिल्ली ४१२२
जम्मू आणि काश्मीर ६६६
हरियाणा ३७०
तामिळनाडू २७५७
बिहार ४८१
केरळ ५९९
ओडिशा १५७
अंदमान निकोबार ३३
अरुणाचल प्रदेश १
चंदीगड ८८
छत्तीसगड ४३
गोवा ७
लडाख २२
मणिपूर २
मिझोरामी १
पुडुचेरी ८
त्रिपुरा ४
उत्तराखंड ५९
एकूण ३९,९८०

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा