वाल्हे येथे ३७२ लोकांनी केले रक्तदान….

पुरंदर, २१ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरा मध्ये विक्रमी रक्तदान करण्यात आले आहे. काल घेण्यात आलेल्या या शिबिरात लोकांनी मोठ मोठ्या रांगा लावून रक्तदान केले.सायंकाळी उशिरा पर्यंत चाललेल्या या शिबिरात वाल्हे व परिसरातील गावातून आलेल्या ३७२ लोकांनी रक्तदान केले.

कोरोनामुळं राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावं, यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच आव्हान केले होते. तसेच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी  आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, पद्मवीभूषण, खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाल्हे (ता.पुरंदर) येथे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘महासंकल्प भव्य रक्तदान’ शिबिराचे आयोजन, वाल्हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधील हॉल मध्ये करण्यात आले होते. रविवारी (दि.२०) डिसेंबर रोजी, सकाळी ९ वाजल्यापासून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले होते. यामध्ये दिवसभरात ३७२ लोकांनी मतदान केले. 

अक्षय ब्लड बँकेच्या माध्यमातून हे रक्त संकलित करण्यात आले. वाल्हे येथील राष्ट्रवादी कांग्रेस व आघाडीतील मित्र पक्षांनी या शिबिराचे आयोजन केले होते. सर्वांनीच या शिबिरात आपला सहभाग नोंवला असे म्हणत पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

न्युज अनकाट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा