२४ तासांत ५५,३४२ नवीन प्रकरणं, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा वेग कमी…

नवी दिल्ली, १३ ऑक्टोंबर २०२०: देशात कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. परंतु महाराष्ट्रात कोरोना प्रकरणात सातत्यानं घट होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सुमारे ७ हजार नवीन प्रकरणं समोर आली आहेत . दररोज मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. २४ तासांत कोरोना मुळं १६५ लोक मरण पावले, काही दिवसांपूर्वी ही संख्या ३०० च्या वर होती. पुणे शहरातील कोरोनाचे आकडेही झपाट्यानं खाली येत आहेत. २४ तासात ३५१ नवीन रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी दर ८३ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे.

दिल्लीतही कोरोना प्रकरणात सुधारणा दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राजधानीत कोरोनाचे १८४९ रुग्ण आढळले तर ४० रुग्णांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत दिल्लीत ३ लाख ११ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर प्राण गमावलेल्यांचा आकडा ५८०० पेक्षा जास्त आहे. राजधानीत कोरोना रिकव्हरी दर ९१ टक्क्यांहून अधिक आहे.

मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेला डेटा

गेल्या २४ तासांत ५५,३४२ नवीन कोरोना रुग्ण आढळले

गेल्या २४ तासात कोरोनामुळं ७०६ लोकांचा मृत्यू

कोरोना प्रकरणांची एकूण संख्या: ७१,७५,८८१

एकूण सक्रिय प्रकरणे – ८,३८,७२९

बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ६२,२७,२९६

कोरोनामधून आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या – १,०१,८५६

दक्षिण भारतातही कोरोना प्रकरणात किंचित घट झाली आहे. तामिळनाडूमध्ये चोवीस तासांत सुमारे ५००० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये एकूण कोरोना प्रकरणं ८ लाखांवर गेली आहेत.

दुसरीकडं केरळमध्ये कोरोना सोबतच्या युद्धाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. केरळ सरकारनं पर्यटकांसाठी नवीन बदल केले आहेत. सोमवारपासून बहुतेक पर्यटन स्थळ उघडण्यात आली आहे तर पर्यटकांना क्वारंटाईन न करता त्यांना सात दिवसांपर्यंत सर्वत्र फिरण्याची मुभा देण्यात आली आहे. तथापि, १ नोव्हेंबरपासून केरळचे समुद्र किनारे उघडण्यात येणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा