देशात कालपर्यंत देण्यात आल्या ७ कोटी ४४ लाख लसी

नवी दिल्ली, ४ एप्रिल २०२१: देशात कोविड-१९ प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रांची संख्या ७ कोटी ४४ लाखांच्या पुढे गेली आहे. काल रात्री ८ वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार लसीच्या एकूण ७,४४,४२,२६७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या ८९,५३,५५२ आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या ५३,०६,६७१ आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या ९६,१९,२८९ कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या ४०,१८,५२६ कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या ४५ वर्षांवरील ४,५७,७८,८७५ लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या ४५ वर्षांवरील ७,६५,३५४ लाभार्थ्यांचा समावेश आहे.

काल देशव्यापी लसीकरणाचा ७८ वा दिवस होता आणि काल रात्री ८ वाजेपर्यंत १३,००,१४६ मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालातील माहितीनुसार यापैकी ११,८६,६२१ लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर १,१३,५२५ लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल आज रात्री उशिरा पूर्ण होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा