सडक २ चित्रपटाच्या ट्रेलरला ८० लाख डिसलाइक

6

मुंबई, १४ ऑगस्ट २०२०: आलिया भट्टच्या आगामी ‘सड़क २’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आकस्मिक निधनानंतर स्टार किड्स आणि नेपोटिझम या चर्चेत सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून आलियाला बऱ्याच पडताळणीला सामोरे जावे लागले आहे आणि हे अजूनही चालू आहे. आलियाचा सडक २ हा चित्रपट लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पण, सोशल मीडिया या चित्रपटाबाबत फारसा खुश दिसत नाही. आलिया भट्टच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे आणि सडक २ चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून जणू आपला राग व्यक्त करण्याचा मार्ग नेट कऱ्यांना सापडला आहे.

रिलीझ झाल्यापासून सडक २ चा ट्रेलर यूट्यूबवर डिसलाइक होत असून आत्तापर्यंत ही आकडेवारी ८ मिलियन म्हणजेच ८ दशलक्ष वापरकर्त्यांची हा ट्रेलर डिसलाइक केला आहे. तसेच गेल्या २ दिवसांपासून या चित्रपटाचा ट्रेलरही अव्वल स्थानी आहे. आता ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आलिया भट्टने तिच्या चित्रपटाची गाणी शेअर केली आहेत. आलियाने सडक २ च्या गाण्यातील ‘तुम से ही’ या गाण्याचे ऑडिओ व्हर्जन इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यासह तिने गाण्याचे पोस्टरही शेअर केले आहे.

या गाण्याच्या पोस्टरमध्ये आलिया भट्ट आपल्या चित्रपटाचा नायक आदित्य रॉय कपूरचे चुंबन घेत आहे. दोघांची जोडी पोस्टर मध्ये चांगली दिसत आहे.

पूजा भट्ट यांनी ट्विट करून हेटर्सचे मानले आभार:

सडक २ चा ट्रेलर ला मिळणाऱ्या डिसलाइक मुळे मागील २ ते ३ दिवसांपासून ती सतत १ क्रमांकावर ट्रेंड करत आहे. याचे कारण असे की, डिसलाइक करण्यासाठी व्हिडिओ ओपन केल्यामुळे तेवढेच व्हिव देखील त्या व्हिडिओला मिळत आहेत. अशा प्रकारे या चित्रपटाचा ट्रेलर तोटा होण्याऐवजी फायद्यात आहे. अशा परिस्थितीत एका सोशल मीडिया वापरकर्त्याने पूजा भट्ट यांना ट्विट करुन असं म्हटलं आहे. वापरकर्त्यांना उत्तर देताना पूजा भट्ट यांनी लिहिले- प्रेम करणारे आणि द्वेष करणारे या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. या दोन्हींनी त्यांचा किमती वेळ आमच्यासाठी दिला आहे आणि त्यामुळेच आमचा हा ट्रेलर ट्रेंडिंग मध्ये आहे. यासाठी तुमचे आभार. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा