लोहा, २९ मे २०२३: लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयातर्गंत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची परीक्षा देणाऱ्या विधार्थ्यांची परिक्षा फी विधापीठांत भरली नसल्यामुळे विधार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. या प्रकारामुळे महाविद्यालयांमध्ये एकच गोंधळ उडाला असून विधार्थ्यांनी लोहा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयातील केंद्रावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. चालू वर्षी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या विधार्थ्यांकडून परीक्षा फी दोन हजार रुपये प्रमाणे भरुन घेण्यात आली. पण विधापीठांत फी जमा करण्यात आली नसल्याचा प्रकार आज परीक्षेच्या दिवशी समोर आला. त्यामुळे विधार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सुमारे ८५० विधार्थ्यांना आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर विधार्थ्यांनी प्राचार्य यांच्याकडे याबाबत विचारणा केली. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकळे नाही. त्यामुळे विधार्थ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुक्त विद्यापीठातील परीक्षेचे कामकाज पाहणारे ए.के. भंडारी मागील आठ दिवसांपासून गैरहजर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शंका उपस्थित केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर