राज्यात पुन्हा ८,९९८ कोरोना रूग्ण, नागरिक मात्र बेफिकीर.

मुंबई, ५ मार्च २०२१: कोरोना विषाणु पुन्हा एकदा थैमान घालताना दिसतोय. आज राज्यात नव्या कोरोना रूग्णांचा संख्येत वाढ होताना दिसली. ज्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जरी सांगितले कि त्यांची लाॅकडाऊन लावण्याची इच्छा नाही. पण, यावर आता लाॅकडाऊन हाच उपाय वाटत आहे.
राज्यात गुरूवारी कोरोनाचे ८,९९८ नवे रूग्ण आढळले आहेत.तर ६० रूग्णांचा कोरोना व्हायरस मुळे  मृत्यू  झाला आहे.राज्यात सध्या ॲक्टीव्ह रूग्ण ८५,१४४ आहेत. तर राज्यातील एकूण  कोरोना रूग्णांची संख्या २१,८८,१८३ आहे.ज्यमधून २०,४९,४८४ रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण  ५२,३४० रूग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.तर नागरिक ही आजून ही रस्त्यावर बेफिकीरीने वावरताना दिसत आहे.ज्या मध्ये सरकार  नागरिकांना अनेक वेळा कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी अहवान करत आहे तर त्याला राज्यातील बहुतांश ठिकाणावरून  केराची टोपली दाखवण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा