विधानसभा: 3 हजार 239 उमेदवार लढणार निवडणूक

महाराष्ट्र राज्य 288 मतदारसंघांत 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट झाले.
   चिपळूण मतदारसंघात सर्वात कमी 3 तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली.
  2 लाख मतदार वाढले
▪ मतदार यादीत 40 लाख बोगस मतदार असल्याचा दावा बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यावर मतदार याद्यांचे सातत्याने पुनरिक्षण केले जाते.
▪ पुनरिक्षणावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येतो. असे 1 लाख 10 हजार प्रतिनिधी नेमण्यात आले होते. त्यानुसार 31 ऑगस्टपासून ते आतापर्यंत 2 लाख मतदारांची वाढ झाल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा