२४८ जवानांनी देशसेवेची शपथ घेतली

अहमदनगर : देशसेवेत आलेल्या जवानांनी ’पहले देश, फिर रेजिमेंट और आखिर मे खुद’ असा मंत्र पाळावा, असे सांगत लेफ्टनंट जनरल देपिंदर सिंह आहुजा यांनी जवानांना देशनिष्ठेची शपथ दिली.

या शपथग्रहण सोहळ्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतून पालक नगर येथे आले होते. हा सोहळा झाल्यानंतर मुलांची भेट घेताना अनेक पालकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रु दिसत होते.
लष्कराच्या माध्यमातून देशाची सेवा करण्याची संधी आमच्या मुलाला मिळाल्याचा अभिमान वाटत असल्याचे पालक सांगत होते.
प्रशिक्षणात सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ले.जनरल आहुजा यांनी रिक्रुट शिवम सिंह याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, राम दयाल मुड याला जनरल केएल डिसुजा रौप्यपदक, तर दिनेश चंद याला जनरल सुंदरजी कांस्यपदक प्रदान केले.
दरम्यान, या संचलनाची पहिली सलामी कर्नल विनायक शर्मा यांनी स्वीकारली. त्यानंतर मुख्य सलामी लेफ्टनंट जनरल देपिंदर सिंह आहुजा यांनी स्वीकारली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा