मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी एक मोठा निर्णय घेतल्याचे माहिती समोर आली आहे.
शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचे आदेश सरकारकडून घेण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय परिपाठातले इतर विषय वगळण्याचाही निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत दररोज परिपाठ होतो. या परिपाठातले विषय शाळा ठरवत असते. या परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे, असा निर्णय सरकारने घेतला आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीने या संबंधीचे वृत्त दिले आहे. परिपाठातले इतर विषय वगळून त्याऐवजी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केले जावे, असा आदेश सरकारने दिले आहेत. ७० वर्षापूर्वी याच दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली होती.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला होता.
मात्र, तत्कालीन सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केली नव्हती.आता उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.