आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही मास्क

मुंबई : देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पहायला मिळत आहे. या व्हायरसपासून बचावासाठी नागरिक एन-९५ या मास्कचा वापर करताना दिसत आहे. मात्र हे मास्क खरेदी करताना दुकानदारांकडून त्यासाठी जादा पैसे आकारले जात असल्याचं समोर आलं आहे. याबाबत कायी वृत्त वाहिन्यांनी स्टिंग ऑपरेशन देखील केले. त्यामुळे आता राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन एन-९५ मास्कची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये असा निर्णय घेतला आहे.

याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत परिपत्रक काढून राज्यातील सर्व विभागातील सह आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.

या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे
◆ कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असणारी पीपीई किट्स आणि एन-९५ मास्क यांची गरज आहे. त्यामुळे यांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.

◆ या वस्तूंची विक्री करताना जादा दर आकारला जात असल्याची तक्रार सरकारकडे आली आहे.

◆ जादा दर आकारले जाऊ नये, यासाठी वैद्यकीय व्यावसायिकाच्या चिठ्ठीशिवाय औषध दुकानांतून या गोष्टींची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी.

◆ तसंच या वस्तूंची साठेबाजी होणार नाही याबाबतही खबरदारी घ्यावी.

त्यामुळे आता मेडिकलच्या दुकानातून एन-९५ मास्क डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळू शकणार नाही.
कोरोना व्हायरसचा एकंही रूग्ण महाराष्ट्रात नाही. मात्र तरीही कोरोना व्हायरबाबत लोकांमध्ये असणारी भीती पाहता मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत याबाबत माहिती दिली.

यावेळी ठाकरे यांनी सांगितले की, “कोरोना व्हायरसमुळे राज्यात चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता याचा मुकाबला केला पाहिजे. ज्या काही सूचना देण्यात आल्या आहेत त्यांचं पालन करावं.”

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा