तामसवाडी-वडांगळी शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक, दि.२९ एप्रिल २०२० : तामसवाडी – वडांगळी शिवारातील मधुकर कचरु सांगळे यांच्या गट नं.२९२ या ऊसाच्या क्षेञामध्ये पाच वर्ष वयाच्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेले महीनाभरापासून या परिसरात बिबट्याची दहशत वाढली होती. वनविभागाने आठ दिवसांपूर्वीच याठिकाणी पिंजरा लावला होता.

याबाबत तामसवाडीचे पोलीस पाटील पांडुरंग शिंदे यांनी वनविभागास कळविल्यानंतर वनक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जी. बी. वाघ, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, भैया शेख यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.
वैद्यकीय तपासणीसाठी बिबट्याला निफाड रोपवाटीकेत आणून, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविद्र चांदोरे यांनी तपासणी केली. पुढील आदेश मिळताच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

अद्याप एका बिबट्याचा याच परिसरात मुक्त वावर असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे. त्यामुळे या परिसरातील बिबट्याची दहशत अद्याप संपलेली नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा