सातारा, दि.१८ मे २०२०: लॉक डाऊनमुळे वाई तालुक्यात अडकलेले १२०० परप्रांतीय मजूर आपल्या गावी रवाना झाले आहेत. यामध्ये उत्तरप्रदेशचे ८००, राजस्थानचे ५० आणि मध्यप्रदेशच्या ३५० मजुरांचा समावेश आहे.
राज्य शासनाने आपआपल्या राज्यात जाण्यासाठी दिलेल्या रितसर परवानगीनंतर आजपर्यंत वाई आगाराच्या लालपरीने १२०० मजुरांना घेवून सातारा रेल्वे स्टेशनवर सुखरूप पोहचवले.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपुर्ण देशात संचारबंदी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने सर्वच उद्योगधंदे व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिकांसह परप्रांतीयांच्या हाताची कामे बंद झाल्याने उपासमारीचे संकट कोसळले.
त्याच दरम्यान मोदी सरकारने देशातील प्रत्येक राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपआपल्या राज्यात तातडीने जाण्यासाठी मोफत रेल्वे सेवा उपलब्ध करुन दिली.
वाई तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना जाण्यासाठी सातारा येथून रेल्वे सेवा उपलब्ध असल्याने शासनाने दिलेल्या सवलतीचा फायदा घेऊन वाई आगराच्या ७० बसेसमधून प्रत्येकी २२ या प्रमाणे २२०० परप्रांतीयांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सातारा (माहुली) येथील रेल्वे स्टेशनवर महसूल विभागाचे कर्मचारी सोबत देवून पोचविण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी: