खासदार धैर्यशील माने यांचा “कोल्हापूर पॅटर्न”

27

कोल्हापूर, दि.२१ मे २०२०: कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी आणखी एक आदर्शवत काम केल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे जनता संकटात असताना, त्याद्वारे क्वारंटाइन करण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी खासदार धैर्यशील माने यांनी आपले स्वतःचे घरच दिले आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील बंगला, त्यांनी रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी दिला आहे.

त्यामुळे क्वारंटाइनसाठी स्वतःचे घर देणारे खासदार माने हे भारतातील पहिले खासदार ठरले आहे. यातून त्यांनी त्यांच्या मनात असलेली ‘कोल्हापुरी पॅटर्न’ ची सुरुवात स्वत:पासून आज केली असल्याचे त्यांनी आज दाखवून दिले.

गेल्या वर्षीही त्यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराने वेढलं होतं. त्यावेळी धैर्यशील माने हे स्वत: महापुरात मदतीसाठी उतरले असल्याचे आपण सर्वांनी पाहिले होते. माने यांनी स्वतः मदतीच्या साहित्याची पोती खांद्यावरुन ट्रकमधून उतरवली होती. त्यांच्या या दिलदारपणातून त्यांनी “कोल्हापूर पॅटर्न” ची सुरुवात केल्याचे आता समोर येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : प्रशांत श्रीमंदिलकर