लॉक डाऊनच्या काळात परसबागेत फुलवला तरकारीचा मळा

पुरंदर दि.५ जून २०२०: कोरोनामुळे अनेक बाजारपेठा बंद झाल्या. नेहमीची लागणारी तरकारी मिळेनाशी झाली. आठवडे बाजार बंद असल्यामुळे दररोज लागणारी तरकारी आणायची कुठून ? असा प्रश्न लोकांना पडला होता. मात्र यावरही काही लोक कल्पकतेने मात करताना दिसत आहेत. भाजीपाला आणण्यासाठी इकडे तिकडे भटकण्यापेक्षा तो आपण आपल्या परस बागेतच उत्पादित करू शकतो याचं. उदाहरण घालून दिले.

पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ.प्रा. दिगंबर दुर्गाडे व त्यांच्या पत्नी यांनी कोरोनाच्या काळात बहुतेकजण अस्वस्थ, अस्थिर आहेत. मात्र काहीजण लॉकडाउन मध्येही मार्ग काढून जगण्याला नवी दिशा देत आहे. कोरोनाने बाजार पेठेवरील अवलंबित्व कमी करा आणि गर्दी टाळा हा धडा दिला आहे. याला अनुसरून भाजीपाल्याच अवलंबित्व कमी करण्यासाठी जिल्हा
बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी पत्नी व मुलीच्या सहाय्याने आपली परसबाग फुलवुन सर्व भाजीपाला घरच्या घरीच पिकविला आहे आणि तोही सेंद्रिय. यामुळे लॉकडाउन मधील मोकळा वेळही कारणी लागला. त्यांना स्वतःच्या परसबागेतील सेंद्रीय भाज्या उपलब्ध झाल्या. त्यामुळे बाजारात जाणेही घटले आणि आरोग्यही सुधारले. पर्यावरणदिनाच्या निमित्ताने परसबाग फुलवा आणि सकस भाज्या खा हा संदेश त्यांनी दिला आहे. या परसबागेत गवार, वांगी, भेंडी, कोबी, मिरची, टोमॅटो, मेथी, फ्लॉवर, लिंबू अशा विविध प्रकारचा भाजीपाला पिकवला असून त्यांची ही परसबाग लोकांमध्ये एक कुतूहलाचा भाग बनला आहे.
याबाबत बोलताना डॉ. दुर्गाडे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात माझे व मुलीचे कॉलेज व पत्नी स्वाती दुर्गाडे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद झाल्याने पुणे सोडून आम्ही गावी कामठवाडीत आलो. संचारबंदीचा काळ असल्याने भाजीपाल्याची अडचण निर्माण झाली होती. आणि मग त्यातूनच मार्ग निघाला बसल्याबसल्या घरामागची परसबाग पुन्हा एकदा फुलविण्याचा निर्णय घेतला. रोज एक दोन तास श्रमदान केले आणि त्यातूनच दोन महिन्यात छान हिरवीगार परसबाग फुलली आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती केलेल्या या परसबागेत आता जवळपास सात ते आठ प्रकारचा भाजीपाला आम्ही पिकवला असून आमच्यासह शेजारील चार दोन घरांना
देखील पुरेल एवढा भाजीपाला या परसबागेत तयार होतो आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा