जम्मू-काश्मीर, दि. १० जून २०२० : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरू आहे. शोपियांच्या सुगो हेधामा भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी सुरू आहे. ४ दहशतवादी ठार झाले आहेत. या आठवड्यात शोपियानमधील चकमकीची तिसरी घटना आहे. यापूर्वी रविवारी पाच आणि सोमवारी चार दहशतवादी ठार झाले होते.
या अहवालानुसार जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ४४ आर आर आणि लष्कराच्या सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळी सुगो हेधामा येथे शोध मोहीम राबविली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार सुरू केला. बुधवारी सुगो हेधामा पहाटेच्या सुमारास गोळ्यांच्या आवाजांनी हादरून निघाला.
वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी पुष्टी दिली की अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. सध्या चार दहशतवादी ठार झाले आहेत, परंतु त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सध्या चकमक चालू आहे तसेच शोध मोहीम देखील चालू ठेवण्यात आली आहे.
या आठवड्यात शोपियांमध्ये चकमकीची तिसरी घटना आहे. यापूर्वी रविवारी सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दुसर्याच दिवशी शोपियान येथे ऑपरेशन करून चार अतिरेकी ठार झाले. गेल्या दोन आठवड्यात १५ हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी